Bjp, Shivsena News  Sarkarnama
मराठवाडा

Bjp-Shivsena News : भाजपकडून लोकसभेची, तर शिंदेसेनेकडून महापालिकेची तयारी...

Marathwada : केंद्रातून आलेल्या मंत्र्यांच्या संकेतानूसार ही जागा भाजपच लढवणार हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : कोरोनामुळे तीन वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा बार येत्या दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात उडण्याची शक्यता आहे. (Bjp-Shivsena News) छत्रपती संभाजीनगर येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या तयारी लागा, अशा सूचना मुंबईतून देण्यात आल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे भाजपने मात्र आपले लक्ष छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर केंद्रित केले आहे.

भाजपचे केंद्र व राज्यातील नेत्यांची शहरात व जिल्ह्यात वर्दळ वाढली असून मोदी सरकारने ९ वर्ष पुर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित सभांमधून (Bjp) भाजप लोकसभेसाठी देखील मोर्चे बांधणी करत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजप लढवणार ? की शिंदेंची सेना (Shivsena) याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी केंद्रातून आलेल्या मंत्र्यांच्या संकेतानूसार ही जागा भाजपच लढवणार हे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेची चर्चा आणि तयारी फक्त भाजपच्या गोटातूनच सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी मात्र अद्याप या संदर्भात अवाक्षर देखील काढायला तयार नाहीत. (Marathwada) अधूनमधून पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट या विषयावर बोलत असतात, मात्र सध्या ते देखील शांत आहेत.

यावरून ही जागा भाजपनेच लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच कदाचित शिंदेसेनेने महापालिकेची तयारी सुरू केल्याचे दिसते. लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधनासभा निवडणुका भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित लढणार आहेत.

तत्पुर्वी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील हे दोन पक्ष सोबत लढणार आहेत. कोरोनामुळे महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात आॅक्टोबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले होते. त्यानंतर आता नोव्हेंबरचा नवा मुहूर्त समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT