Sanjay Lathkar, Nanded Sarkarnama
मराठवाडा

नांदेडचे सुपुत्र संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपूर्ण पदांवर कार्य केले. (Nanded District)

अभय कुळकजाईकर : सरकारनामा ब्युरो

नांदेड : भारतीय पोलीस सेवा १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. (Nanded) लाठकर हे मूळचे लाठी (ता. कंधार, जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत.(Marathwada) लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्ष देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र व सीआरपीएफमध्ये उत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. (Maharashtra)

या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी आठ विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आले असून त्यात राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक, दोन वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे.

बिहार व झारखंड राज्य सरकारद्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आले असून सीआरपीएफमध्ये गडचिरोली व नागपूर येथे डीआयजी तसेच रांची व मुंबई येथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी अकरा डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आली आहेत.

तसेच लाठकर यांना आत्तापावेतो ६० पेक्षा अधिक प्रशस्तीपत्रेही मिळाली आहेत. महाराष्ट्रात लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपूर्ण पदांवर कार्य केलेले असून त्यांना राज्य शासनाने दोन वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.

लाठकर यांनी लातूरला पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना पहिल्या वर्षी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत लातूर राज्यात दुसरे आले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी काम करताना या योजनेत लातूर राज्यात पहिले आले होते. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांनी मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल केला. त्यांनी मोक्कातंर्गत आठ गुन्हे दाखल केले होते आणि त्यातील काही जणांना शिक्षाही झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT