AIMIM March Against Police Update News  Sarkarnama
मराठवाडा

Aimim March Against Police News : दोषी पोलिसांवर कारवाईचे आश्वासन, एमआयएमचा मोर्चा स्थगित..

Police : पोलीसांनी चुकीची माहिती देवुन वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभुल केल्याचे मान्य केले.

सरकारनामा ब्युरो

Mp Imtiaz Jalil : कन्नड तालुक्यातील शेलगांव येथील दोन समुदायाच्या वादातून झालेल्या दंगली दरम्यान मुस्लिम महिलेला पोलिसांकडून झालेल्या अमानूष मारहाण प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आहे. (AIMIM March Against Police Update News) खासदार इम्तियाज जलील यांना संबंधित दोषी पोलिंसावर कठोर कारवाई करण्याचा शब्द देण्यात आल्यामुळे उद्या (ता.६) रोजी कन्नड येथे काढण्यात येणार एमआयएमचा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे.

शेलगाव येथील ३८ वर्षीय महिला शबाना पटेल यांना रात्रीच्या वेळी घरात घुसुन अमानुषपणे (Aimim) मारहाण करणाऱ्या एपीआय कोमल शिंदे व इतर चार पोलीस कर्मचार्‍यांविरोधात सखोल चौकशी करुन कडक कायदेशिर कारवाई करण्याचे आश्वासन विशेष पोलीस महानिरिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर यांनी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना दिले.

त्यामुळे मंगळवार रोजी औरंगाबाद ते कन्नडपर्यंत पोलीस अत्याचाराच्या विरोधात काढण्यात येणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. (Police) मर्यादित कालावधीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी पोलीसांविरोधात कडक कायदेशिर कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

इम्तियाज यांच्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक व अतिरिक्त अधीक्षक यांनी संबंधित स्थानिक पोलीसांनी चुकीची माहिती देवुन वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभुल केल्याचे मान्य केले. दरम्यान यापूर्वीच इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध करत पीडितेचे फोटो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांकडे पाठवले आहेत.

सबब महिलेला रात्रीच्या वेळी घरात घुसुन पुरुष पोलीस बेदम मारहाण करतात हे कृत्य निषेधार्थ व बेकायदेशिर असुन त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात आली होती. तसेच पिडित महिलेला न्याय देण्यासाठीच उद्या कन्नडमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT