Prophecy News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Political Prediction: शिंदेना राजयोग, फडणवीसांना पक्षांतर्गत विरोध तर ठाकरेंना होणार मानसिक त्रास..

Maharashtra Politics Prediction: एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत भाग्योदयाचे योग आहेत, सध्या ते मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील.

सरकारनामा ब्युरो

Jyotishya Vastu Conference : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत सध्या राजयोग आहे, त्यामुळे ते पदावर कायम राहतील. (Maharashtra Politics Prediction) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र भरपूर पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागेल, तर उद्धव ठाकरे यांचे त्यांच्याच सहकाऱ्यांशी मतभेद होतील आणि त्याचा प्रचंड मानसिक त्रास त्यांना होणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे १२ व १३ डिसेंबर अशा दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय ज्योतीष्य वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Eknath Shinde) या दरम्यान, निवडणूक योग या विषयावर ज्योतिष्याचार्य अनंत पांडव यांनी वरील भविष्यावाणी केली आहे. (Uddhav Thackeray) सहा महिन्यापुर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

तर ज्या फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित समजले जात होते, त्या फडणवीसांना बॅकसीटवर म्हणजे उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते. यामागे या दोन्ही नेत्यांच्या कुंडलीत तसे योग होते, असा दावा अधिवेशनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचा सध्या भाग्योदयाचा काळ आहे. त्यांच्या नशिबात सध्या राजयोग असून ते पुढील काही काळ मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. तर फडणवीस यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार आहे.

अनंत पांडव म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत भाग्योदयाचे योग आहेत, त्यांना राजयोग असल्याने सध्या ते मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील. फडणवीसांना मात्र मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत मानसिक त्रास संभवतो. येणाऱ्या काळात ठाकरेंच्या त्यांच्याच सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. यातून त्यांना मानसिक त्रास देखील सहन करावा लागणार असल्याचे भाकित पांडव यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT