Mla Prashant Bamb : महाविकास आघाडी सरकारच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा मुद्दा सभागृहात उपस्थितीत करत गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी खळबळ उडवून दिली होती. Bjp त्यानंतर राज्यभरातील शिक्षक, त्यांचे कुटुंबिय, संघटना, पदवीधर, शिक्षक आमदार बंब यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. औरंगाबादेत त्यांच्याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र बंब काही माघार घ्यायला तयार नाहीत. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्धचा आपला हा लढा राज्यभरात सुरू राहील अशी घोषणा बंब यांनी केली होती.
आता जिल्हांतर्गत बदल्यांसाठी बोगस शस्त्रक्रियांचे कारण देणाऱ्या पुणे विभागातील शिक्षकांची माहिती बंब यांनी मागितल्याचे समोर आले आहे. (Teachers) किती शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सूट मिळावी किंवा आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी, यासाठी बोगस शस्त्रक्रिया आणि अंतराबाबतचे बोगस दाखले, दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले, याची गाव आणि शाळानिहाय माहिती देण्यात यावी, असे पत्र प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओंना पाठवले आहे.
बंब यांनी १० डिसेंबर २०२२ रोजी आयुष प्रसाद यांना हे पत्र दिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सध्याच्या चालू बदली प्रक्रियेत किती शिक्षकांनी शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यापैकी किती जणांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्जित रजा घेतलेल्या नाहीत आणि किती जणांनी अंतर, दिव्यांगांबाबतचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, याची सविस्तर माहितीची मागणी याद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील काही शिक्षकांनी चार संवर्गापैकी पहिल्या दोन संवर्गात बदलीतून सूट मिळण्यासाठी काहीजणांनी बोगस घटस्फोट, बोगस शस्त्रक्रिया तर काहींनी अंतराचा बोगस दाखला सादर केल्याचे समोर आले होते. याची दखल घेत बंब यांनी हे पत्र पाठविले आहे. त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बंब पुन्हा एकदा शिक्षकांच्या बदली, मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा तापवण्याची शक्यता आहे.
शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या पिढ्या बरबाद होत असल्याचा आरोप बंब यांनी केला होता. यासाठी आपल्याच मतदारसंघातील परिस्थिती आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा याचे स्टिंग बंब यांनी केले होते. अशा प्रकारे आपण राज्यभरातील शिक्षक आणि शाळांचा आढावा घेणार असल्याचे बंब यांनी जाहीर केले होते. पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती मागवल्यानंतर बंब यांनी अद्यापही शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा सोडलेला नाही हे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.