Buldana shivsena-shinde Group News Sarkarnama
मराठवाडा

शिवसेनेच्या कार्यक्रमात आमदार गायकवाडांच्या पुत्रासह कार्यकर्त्यांचा राडा; मारहाण झाल्याचा आरोप

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश करत थेट सभागृह गाठून तेथे उपस्थित शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिंदे गटाकडून सभागृहातील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : बुलडाण्यातील (Buldana) शिवसेना (shivsena) पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात जोरदार राडा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी नियुक्त केलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दरम्यान, शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणात बुलडाणा पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केला आहे. (Pushing, beating between Shiv Sena and Shinde group in Buldana)

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षावर दावा केला आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याच पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नव्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ बुलाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिवसनेचे उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश करत थेट सभागृह गाठून तेथे उपस्थित शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिंदे गटाकडून सभागृहातील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, हल्ला करणाऱ्यांजवळ हत्यारही होती. तसेच, सत्तेत असणाऱ्यांच पोलिस मदत करत होते, असा आरोपही खेडेकर यांनी सांगितले. या घटनेमुळे बुलडाणा बाजार समिती परिसरात सध्या तणावसदृश्य परिस्थिती आहे. या ठिकाणी शीघ्र कृती दलासह पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार संजय गायकवाड आणि पक्षाच्या बहुतांश पदधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव, आमदार संजय गायकवाड आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेकडून नियुक्त करण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात शिंदे गटाकडून शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT