ED raids  Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा? नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी

PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा गैरव्यवहाराबाबत ही कारवाई करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

ED raids News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा वाटपातील अनियमिततेच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अकोला अशा तब्बल नऊ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान विविध आरोप करणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईची माहिती ईडीने ट्विटरवर दिली आहे.

पंतप्रधान आवास योजनेत घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर या आधी तीन दिवसांपूर्वीही पुणे, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने छापेमारी केली होती.

ईडीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयासह निवासस्थानी झडती घेतली होती. तसेच पथकाने कागदपत्रांची तपासणी केली होती.

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा गैरव्यवहाराबाबत ही कारवाई करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली जात असून नेमंक कोणावर कारवाई झाली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT