Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama
मराठवाडा

माझी दोन भाषणे काय झाली, सगळे फडफडायला लागलेत; राष्ट्रवादीवर पुन्हा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : महाराष्ट्रातील नेते रोज बरळत आहे. आज लहान मुले राजकारण्यांकडे बघून काय शिकत असणार. हे रोज टिव्हीवर चालते हे राजकारण आहे? या महाराष्ट्राने देशाला विचार दिला. समाजवाद, हिंदुत्व, कम्युनिझम हे सगळे विचार महाराष्ट्रातून गेले आहेत. सर्वात जास्त समाजसुधारक महाराष्ट्राने दिले आहेत. आज महाराष्ट्राची काय स्थिती झाली? आई बहिणीवर शिव्या दिल्या जात आहेत. कोणीच मुद्द्यावर बोलत नाही, गुद्द्यावरच बोलले जाते, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेत्यांना लगावाला.

राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत बोलत आहेत. ते म्हणाले, राज ठाकरेचे भाषण आहे, मग हल्लागुल्ला करा आणि जा असे सुरु आहे. या राजकारण्यांना हेच हवे आहे. माझी दोन भाषणे काय झाली, सगळे फडफडायला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काय सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी आणि राज्यासाठी चांगले नाही. शरद पवार यांनी जातीजातीमध्ये विष पेरले त्यामुळे समाजात दुही निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून बघायचा. हातात पुस्तक घेतल्यानंतर लेखक पाहायचा, असा आरोप राज यांनी केला.

पवार नास्तिक आहेत असे मी म्हटलो तर ते त्यांना लागले. मला जे माहिती आहे तेच मी सांगितले. त्यानंतर लगेच फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहे. जिकडे सभा घेतात तिथे सांगतात राज ठाकरे यांनी आजोबांची पुस्तके वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवे ते न वाचता सगळी पुस्तके वाचली पाहिजे. मी सर्व वाचले आहे. ते सर्व लेखन परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारे ते लीखान नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवले आहे. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

माझ्या आजोबांचे चरित्र आहे. 'माझी जीवनगाथा'. हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेले काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ माझ्या आजोबांनी सुरु केली होती. रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात का? त्यांनी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिले आहे, त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठेही वाचलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT