Marathwada Political News : राजकारणात यायचे आहे. पण शिकण्याची, प्रसंगी वाकण्याची तयारीच नसेल तर अर्थ नाही. नेता तो तोच जो संयमी आहे. ज्याचा आपले विचार व आचारावर ताबा आहे. नेतृत्व हे आयते मिळत नाही. ते तयार करावं लागतं, वाढवाव लागत. नेतृत्वासाठी कष्ट घ्यावे लागतात. साधे लग्नाच्या पंगतीत तुम्ही खाली वाकून पत्रावळी उचलल्या तरच दुसरे चार जण मदतीला धावतात. पुढाकार घेण्याची ही वृत्ती म्हणजे नेतृत्वगुण.
घाईघाईने नव्हे तर अनुभव घेऊनच राजकारणात प्रवेश करा, असा सल्ला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी युवकांना दिला. छत्रपती संभाजीनगर येथ यिन समर युथ समिटमध्ये हरिभाऊ बागडे यांनी राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात हाताला काम नाही म्हणून राजकारणात येणाऱ्यांची स़ंख्या जास्त आहे. युवा अवस्थेत असताना थेट राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अगोदर आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ते बघा.
तुमच्या गावातील शाळा नीट करा, गरजू मुलांना शिकवा. आमच्या काळात शाळा नव्हत्या. गावातील कुणी मोठं माणूस शिकवायचे. त्या मोबदल्यात पालक त्यांना धान्य द्यायचे. आज तर खूप वेगळी परिस्थिती आहे. (Chhatrapati Sambhajinagar) संघटनात्मक कार्य, समाजकार्य, सार्वजनिक समस्यांवर काम करा. मोठी झेप घेण्यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टीतून झालेली सुरवात ही महत्त्वाची आहे. केवळ राजकारण नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात कष्ट घ्यावेच लागतात. स्पर्धा परीक्षेला कष्ट घ्यावे लागत नाही या भ्रमात राहू नका, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.
शोध घेण्याची वृत्ती जागृत होईल
हरिभाऊ बागडे यांनी अशा समिट या तरूणाईसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमातून मैत्री होते. पुढे संवादातून सुसंवाद घडतो. वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त्यांचे म्हणणे तुम्हाला पटेल किंवा पटणारही नाही. तरीही यातून विचारांचे मंथन होईल व शोध घेण्याची वृत्ती जागृत होईल. अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, झाशीची राणी, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज यांनी कमी वयात अद्भुत कार्य केले. मग आपण मागे रहायला नको, असे आवाहन बागडे यांनी उपस्थित युवकांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.