Nanded BJP News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नांदेड शहरासाठी महत्त्वाची घोषणा केली. नांदेडला साडेचार हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प येऊ घातला आहे. या घोषणेनंतर नांदेडचे भाजपा नेते तथा खासदार अशोक चव्हाण हे प्रचंड खूष आहेत. हा प्रकल्प दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. तर दुसरीकडे हा प्रकल्प आपल्याच मतदार संघात व्हावा, यासाठी आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग लावली.
नांदेड जिल्ह्यात 4 हजार 250 कोटींची गुंतवणूक असलेला आणि दोन हजार रोजगार निर्मिती करणारा हेलिप्लांट हा प्रकल्प कृष्णूर या आपल्या मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत उभारण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली. या शिवाय आणखी दोन-तीन मोठे प्रकल्प आपल्या मतदारसंघात द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
नांदेडमधील प्रस्तावित हेलिप्लांटच्या निर्मितीवरून श्रेयवाद आणि राजकारण सुरू झाले आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी हा प्रकल्प दिल्याबद्दल अशोक चव्हाण यांचे आभार मानले. तर त्यांचे जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही हा प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
तर आता हा प्रकल्प आपल्या नायगाव मतदार संघातील नांदेड-देगलूर मार्गावरील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. इथे या प्रकल्पासाठी लागणारी जमीन उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सांगीतले.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेली घोषणा राज्य सरकार व 'रिटाव्हिया प्रायव्हेट लिमिटेड' दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबाबत आहे. या कराराअंतर्गत नांदेडमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती, जुळवणी आणि सुट्या भागांच्या उत्पादनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, हेलिकॉप्टरसाठी आवश्यक अभियांत्रिकी सेवा आणि देखभाल व दुरुस्ती सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.