Rajesh Top News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope News : लोकशाहीवर भाषण ठोकणाऱ्या भुऱ्याची टोपेंनाही भुरळ...

Marathwada : हे तर आमच्या मतदारसंघातील टॅलेंट, असे म्हणत त्यांनी कार्तिकबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली.

सरकारनामा ब्युरो

Jalna : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एका छोट्या मुलाचा प्रजासत्ताकदिनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोकशाहीवर भाषण देतांना भोऱ्या टोपण नाव असलेल्या कार्तिकने (Kartik) आपल्या भोळ्या-भाबड्या आणि बोबड्या शब्दात केलेले भाषण अनेकांना भावले.

राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या मतदारसंघातील या मुलाने त्यांना देखील भुरळ घातली. हा चुणूकदार मुलगा आपल्या मतदारसंघातील असल्याचे माहित झाल्यावर टोपेंनी त्यांचा शोध घेतला आणि त्याला घरी बोलावून घेतले. (Jalna) सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आलेले त्याचे भाषण टोपेंनी स्वतः ऐकले आणि त्यांचे कौतुक केले.

हे तर आमच्या मतदारसंघातील टॅलेंट, असे म्हणत त्यांनी कार्तिकबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली. नुकतेच प्रजासत्ताक दिनानिमित्त एका शालेय मुलाने केलेले भाषण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाले. अक्षरशः हजारो लोकांनी ते स्टेटसला तर ठेवलेच पण सोशल मीडियावर पोस्टही केले.

हे भाषण कार्तिक वजीर या पहिलीतील मुलाचे असून हा मुलगा रेवलगाव तालुका अंबड या माझ्या मतदारसंघातील आहे. कार्तिक हा अत्यंत खोडकर आणि उत्साही मुलगा आहे. त्याच्या भाषणातून त्याला लोकशाहीची असलेली पुसटशी का होईना पण जाणीव दिसून येते.

कार्तिकला सर्व जण `भोऱ्या` या टोपण नावाने हाक मारतात. या भोऱ्याला माझ्याकडून शुभेच्छा, अशा शब्दात टोपे यांनी कार्तिक व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले. त्याचा हार घालून सत्कार करत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. भोऱ्याचे भाषण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT