Mp Rajani Patil,Beed
Mp Rajani Patil,Beed Sarkarnama
मराठवाडा

रजनी पाटील लागल्या कामाला ; बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी..

सरकारनामा ब्युरो

बीड : दोन दिवसांपूर्वीच राज्यसभेवर बिनविरोध खासदार झालेल्या काँग्रेसच्या रजनी पाटील कामाला लागल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्या थेट बांधावर पोचल्या आहेत. वीज, रस्ते दुरुस्ती प्रश्नांवर त्यांनी थेट मंत्र्यांशी संपर्क साधून अनेक मागण्याही केल्या.

रजनी पाटील यांच्या राज्यसभा खासदारकी निवडीवर परवाच शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सोमवार रात्री व मंगळवारी जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकर उडाला. रजनी पाटील यांच्या केज तालुक्यासह अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, धारुर व गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मंगळवारी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन बुधवारी लागलीच रजनी पाटील जिल्ह्यात पोचल्या. त्यांनी केज तालुक्यातील नायगाव येथून नुकसान पाहणीला सुरुवात केली. शेतकऱ्यांना भेटून संवाद साधत धीरही दिला. अनेकांचे घर, संसार उघड्यावर आले आहेत, घरात खायला काही शिल्लक राहिले नाही, जनावरे वाहून गेलीत, शेतात फक्त पाणीच वाहत आहे, असे हे विदारक चित्र मी ३९ वर्षात पहिल्यांदा पाहतेय, अशा शब्दांत रजनी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

घाबरू नका राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. नायगाव, अपेगाव, अंजनपूर, कोपरा या केज व अंबाजोगाई तालुक्यांतील गावांची त्यांनी पाहणी केली. दरम्यान, उंदरी नदीचे पाणी नयगावात शिरल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले.

वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यांनी स्पॉटवरुनच उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांनीही तत्काळ उपअभियंता अंबेकर यांना फोन करुन हवे ते साहित्य मागा पण दुरुस्ती करा, अशा सुचना दिल्या. कळंब - अंबाजोगाई राज्य रस्त्यावरील सावळेश्वरच्या पुलाच्या दुरुस्तीबाबत त्यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करण्याची ग्वाही, चव्हाण यांनी रजनी पाटील यांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT