Swabhimani Sanghtana, Raju Shetty
Swabhimani Sanghtana, Raju Shetty Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetty : सरकारला आमचा पाठिंबा, पण सोबत राहायचे की नाही याचा विचार करतोय..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : लोकांनी आजवर मुंबईत गॅंगवॉर पाहिले आहे. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय टोळीयुद्ध सुरू असल्याचे जनता अनुभवत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. आज आम्ही आघाडी सरकारसोबत (Mahavikas Ahgadi) असलो तरी भविष्यात त्यांच्यासोबत राहायचे का नाही याचा विचार सुरू असल्याचेही शेट्टी म्हणाले. (Marathwadad)

औरंगाबादेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आमचा पाठींबा आहे मात्र यापुढे आघाडीसोबत राहायचे किंवा नाही याचा विचार सुरू आहे. सर्वच क्षेत्रात साम्राज्यवाद आहे, राजकारणातही मोठे पक्ष छोट्या पक्षांना गिळण्याचा प्रयत्न करत असतात.

पण हा कृतघ्नपणा आहे, आधी छोट्या पक्षाची मदत घ्यायची आपली माणसे निवडून आणायची, सत्ता स्थापन करायची आणि नंतर छोट्या पक्ष, संघटनातील लोकप्रतिनिधींना अमिषे दाखवायची. हे छोट्या संघटनेतील प्रतिनिधी सामान्य कुटूंबातुन, चळवळीतुन आलेली असतात दुर्दैवाने अलिकडच्या काळात या अमिषांना, प्रलोभनांना ते बळी पडत आहेत.

हे केवळ स्वाभिमानीच्या बाबतीतच घडले असे नाही अन्य पक्षांच्या बाबतीतही घडते आहे. म्हणून आपण प्रयत्न करायचे सोडून द्यायचे नसतात. चांगुलपणावर अजूनही विश्‍वास ठेऊन आपण प्रयत्न करत रहायचे. छोट्या पक्ष, संघटनांनीही आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. संस्कार करूनच लोकप्रतिनीधी तयार केले तरच ते निष्ठेने पक्षाचे काम करतील, असेही शेट्टी म्हणाले.

राज्यात मध्यावधीची शक्यता फेटाळून लावतांना सरकारमधून कोणीही बाहेर पडणार नाही. कारण बाहेर पडले तर ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे शिवाय तुरूंग वाट पाहत आहेत. यामुळे एकमेकांवर विश्‍वास नसला तरी मुदत संपेपर्यंत सरकार स्थिर राहील, असा दावाही शेट्टी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT