Dhanjay Munde, Pankja Munde Sarkarnama
मराठवाडा

Politcial News : श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा : परळीत निघाली शोभायात्रा; मुंडे भावंडांचा सहभाग

Dattatrya Deshmukh

Parali News : अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोमवारी २२ जानेवारीला होणार आहे. या अनुषंगाने सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामाची अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल पाचशे वर्षांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळीसारखे वातावरण तयार होत आहे. या निमित्ताने श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे लोकोत्सव समितिच्या वतीने रविवारी शोभायात्रा काढण्यात आली.

प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातून निघालेल्या या शोभायात्रेत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे देखील सहभागी झाले. शोभायात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रभू श्रीराम व रामभक्त हनुमान यांच्या भव्य प्रतिकृतींचा समावेश असलेल्या शोभायात्रेत शहर व परिसरातील रामभक्त, महिला भगिनी,तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रेत भगवे झेंडे, रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषा केलेली मुले व महिला वेशभूषेसह सहभागी झाल्याने सर्वांचे आकर्षक ठरले होते. यावेळी रामभक्तांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय चा जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता.

युवक मंडळीच्या लेझिमने सर्वांचे लक्ष वेधले. तर युवक मंडळी डिजेच्या तालावर थिरकले. शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होती. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या तसेच कलश घेवून व भजने गात सहभागी झाल्या. संपूर्ण परळीकरांनी आपापल्या घरावर प्रभु श्रीरामाचे फोटो असलेले ध्वज, भगव्या पताका, घरावर विद्युत रोषणाई केली होती.

शोभायात्रेच्या मार्गावर स्वतः व्यापारी बांधवांनी स्वःखर्चाने भगव्या पताक्यांनी रस्ते सजवले तसेच रविवारी सकाळी संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. शोभायात्रा संपेपर्यंत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून संपूर्ण परिवारासह सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते कारसेवेत

शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या संख्येने महिला व नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते. धनंजय मुंडे (Dhanjay Munde) व पंकजा मुंडे (Pankja Munde) सुरुवातीपासून शोभायात्रा संपेपर्यंत सहभागी झाले होते. धनंजय मुंडे म्हणाले, माझे वडील व काकासह संपूर्ण कुटुंब कारसेवेत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रभू श्रीरामाचे मंदिर होत असल्याने इतर रामभक्तांप्रमाणे आमच्या परिवारालाही खुप आनंद झाला आहे.

मुंडे परिवाराला या क्षणाचा खूप आनंद

यावेळी माजी पंकजा मुंडे म्हणाल्या की, दिवंगत गोपीनाथ मुंडे व मामा प्रमोद महाजन हे लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेत सहभागी झाले होते. मी पण लहान असताना सहभागी झाले होते. यामुळे मुंडे परिवाराला या क्षणाचा खूप आनंद झाला आहे.

(Edited By-Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT