Ramdas Athavale , Nana Patole
Ramdas Athavale , Nana Patole sarkarnama
मराठवाडा

रामदास आठवले पटोलेंना म्हणाले, 'हिंमत असेल तर सत्तेमधून बाहेर पडा'

सरकारनामा ब्युरो

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला होता. यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी पटोलेंना टोमणा लगावला आहे. ते नांदेड येथे बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. नाना पटोले म्हणतात राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादीच्या खंजीरामुळे काँग्रेस एवढी रक्तबंबाळ झाली असेल तर त्यांनी राष्ट्रवादी सोबत राहू नये.हिंमत असेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा,"

"काँग्रेसने जर पाठिंबा काढला तर सरकार पडेल आणि आम्ही आमचे सरकार कधी बनवतोय याची वाटच बघतोय. हे सरकार पडल्यास सरकार बनवण्याची आमची ताकद आहे," असे विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली, त्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला.

गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. याच सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT