Marathwada : भारतीय जनता पक्षाच्या धाराशीव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. (Dharashiv Bjp Political News) लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी नितीन काळे, तर विधानसभानिहाय दत्ता कुलकर्णी, सुरेश देशमुख, सतिष दंडनाईक व राहुल पाटील यांना निरिक्षक पद देण्यात आले आहे. या निवडीवर नजर टाकली तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाला तीन मतदारसंघ दिले गेले आहेत.
एकमेव धाराशिव- कळंब मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख म्हणुन माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. (Osmanabad) या निवडीवर राणा पाटील यांचा प्रभाव असल्याने जुन्या भाजपचे अधःपतन होत असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारणीची निवड मध्यंतरी झाली. त्यामध्ये काहीप्रमाणात जुन्या (Bjp) भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते.
शिवाय त्यात राणा पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेण्यात आले होते. आता विधानसभा व लोकसभा निरिक्षक पदाच्या जबाबदाऱ्या निश्चित करतांना मात्र राणा पाटील यांच्या गटाला झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीतही राणा पाटील यांचीच मर्जी चालेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जुने व नवे हा वाद नवा नाही. त्यामुळे जाहीर झालेल्या यादीमध्ये जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना बळवत आहे. ज्यांना जुने म्हणुन गेल्यावेळी जिल्हाध्यक्ष पद दिले, त्यांनीच जुन्याना बेदखल केल्याने संघटनेतील जुने व निष्ठावंत भाजपची मंडळी नाराज होती.
यंदाच्या निवडीवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतांना त्यामध्ये नेमक कोणत्या गटाला प्राधान्य दिले जाणार याची उत्सुकता लागली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुक प्रमुख पदी निवडीत तीन मतदारसंघाची जबाबदारी एकाच गटाकडे गेल्याने पुढील दिशा स्पष्ट झाली आहे. धाराशिव-कळंब मतदारसंघ दत्ता कुलकर्णी, तुळजापुर सुरेश देशमुख, परंडा सतिष दंडनाईक व उमरगा राहुल पाटील सास्तुरकर या चार नेत्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लोकसभा निरिक्षक निवडतांना जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांना संधी देऊन तिथेही राणा पाटील यांचीच बाजु भक्कम झाली आहे. यामध्ये धाराशिव कळंब येथे दत्ता कुलकर्णी वगळता इतर तीन ठिकाणच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सतिष दंडनाईक यांना परंडा मतदारसंघाची जबाबदारी दिली असुन त्या ठिकाणी स्वतः माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांच्यासारख्या संघटनेतील जेष्ट व्यक्ती असताना मतदारसंघाच्या बाहेरील व्यक्तीस पाठविण्यात आले आहे. या निवडीमुळे जुन्या व नव्या भाजपमधील अंतर अजुन वाढणार असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.