Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Tuljapur Assembly Constituency : टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमुळे आर्थिक कायापालट होणार! दहा हजार तरुणांच्या हातालाही काम

Technical Textile Park will transform the district, believes Rana Patil : कौडगाव एमआयडीसीसाठीची बार्शी तालुक्याच्या हद्दीतील 1 हजार एकर जमीन वगळली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दीड हजार एकर जमीन या एमआयडीसीसाठी संपादित केली आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यातील गेम चेंजर असे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. हे प्रकल्प पूर्ण होतील. त्यातीलच एक असलेल्या कौडगाव एमआयडीसीतील टेक्निकल टेक्स्टाईल पार्क प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणार आहे. या प्रकल्पाकरिता पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 24 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या (ता. 8) येथील मल्टीपर्पल हायस्कूलच्या मैदानावर सभा होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (Ranajagjeetsingh Patil) या सभेसह जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महत्वकांक्षी प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती राणा पाटील यांनी पत्रकरांना दिली. विकासावर बोलू काही या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी रोज एका प्रकल्पाची माहिती देणार असल्याचे पाटील म्हणाले.

कौडगाव एमआयडीसीसाठीची बार्शी तालुक्याच्या हद्दीतील 1 हजार एकर जमीन वगळली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दीड हजार एकर जमीन या एमआयडीसीसाठी संपादित केली आहे. या ठिकाणी 50 मेगाव्हॅट क्षमतेच्या 250 कोटींच्या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. येथील टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पाचा अहवाल तयार झाला.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाची विधानसभेत घोषणा केली. पायाभूत सुविधांसाठी 24 कोटींची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. (BJP) या प्रकल्पातून जिल्ह्यातील 10 हजार बेरोजगार तरूण-तरूणींना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी बोलणे सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा आर्थिक कायापालट होणार आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT