Bjp Leader Raosaheb Danve
Bjp Leader Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : सगळे ओबीसी मंत्री शोभेच्या वस्तू ; अन्याय हेच सरकारचे धोरण

सरकारनामा ब्युरो

जालना : भाजपने ओबीसी आरक्षणाचा खून केला या मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सगळे ओबीसी मंत्री हे केवळ शोभेच्या वस्तू आहेत. ओबीसींवर अन्याय हेच या तिघाडी सरकारचे धोरण असल्याची टीका दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली. (Jalna) जे सरकार २ वर्षात इम्पेरीकल डाटा देऊ शकले नाही ते सात महिन्यात काय देणार ? असा सवाल देखील त्यांनी केला.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महिला बचत गटाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सॅनेटरी पॅडसच्या युनीटचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यातील राजूर या ठिकाणी झाले. (Bjp) त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी आघाडी सरकार, ओबीसी आरक्षण, राज ठाकरे यांची घेतलेली भेट यासह अन्य विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

दानवे म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना भाजपने पुढे केल्याची टीका खडसे यांनी केली, पण राज ठाकरे यांना आम्ही पुढे आणले नाही तर ते फक्त भाजपची भूमिका त्यांना पटल्यामुळे आमच्या बाजूने बोलत आहेत. भाजपचे काम आणि कर्तृत्व पाहून ते प्रभावित झाल्यामुळे पक्षाची बाजू घेत असतील.

मुंबईत माझी आणि त्यांची झालेली भेट राजकीय नव्हती. त्यांनी केलेल्या फोननंतर ही भेट झाली होती. आयोध्या दौऱ्यासाठी त्यांना रेल्वे गाड्या मागितल्या होत्या, या शिवाय कुठलीही राजकीय चर्चा आमच्यात झाली नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. ब्राम्हण मुख्यमंत्री पाहू इच्छितो या आपल्या विधानाचा देखील दानवे यांनी पुनरुच्चार केला.

जालन्यातील त्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या वक्त्याने पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वार्डात ब्राह्मणांना तिकिटे द्या, अशी मागणी केली होती. त्यावर आपण ते विधान केले होते. खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यात आपल्या विरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले आहे. यावरील प्रश्नावर ते राणा यांनाच विचारा असे म्हणत दानवे यांनी यावर भाष्य करणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT