Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : खासदार निधी कमी असला म्हणून काय झाले ? माझ्याकडे अलाउद्दीनचा चिराग..

Bjp : खासदार निधीच्या भरवशावर न राहता मी राज्य सरकारकडून निधी आणू शकतो.

सरकारनामा ब्युरो

Jalna News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या विकास निधीची तुलना करत मजेशीर विधान केले आहे. जालना येथील एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले, खासदार निधी कमी असला तरी माझ्याकडे अलाउद्दीनचा चिराग आहे, त्यामुळे पैशाची कमी नाही.

खासदारांना सहा विधानसभेच्या एका लोकसभा मतदारसंघासाठी पाच कोटी निधी मिळतो, तर आमदारांना एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच कोटी. (Jalna) त्यामुळे खासदार निधीतून प्रत्येक मतदारसंघात बिड्या जरी वाटायचं ठरलवं तर निधी पुरणार नाही, (Bjp)असा चिमटा दानवे यांनी काढला.

जालना शहरातील बडी सडक रस्त्याच्या उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. दानवे म्हणाले, आमदारांना एका विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मिळतात. तर मला माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघासाठी पाच कोटी रुपये निधी मिळतो. खासदार निधीतून पैसे कमी मिळत असले तरी मी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आहे.

त्यामुळे आमदार आणि खासदार निधीच्या भरवशावर न राहता मी राज्य सरकारकडून निधी आणू शकतो. यातून शहरातील रस्त्यांची कामे केली जातील. शहरातील एका रस्त्याच्या कामासाठी ७ कोटी रुपये दिले. माझ्याजवळ अलाउद्दीनचा चिराग आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मी कितीही पैसे आणू शकतो, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT