Central Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News
Central Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : शिंदे-ठाकरे दोघांच्याही सभा लक्ष देऊन ऐकणार..

सरकारनामा ब्युरो

जालना : येत्या पाच ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तर मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा होणार आहे. या निमित्ताने दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली असून मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे.

भाजप व आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे देखील या दोन्ही मेळाव्यांकडे बारकाईने लक्ष असणार आहे. या मेळाव्या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना तुम्ही कुणाची सभा ऐकणार? असे विचारले असता `मी ठाकरे आणि शिंदे दोघांचीही सभा लक्ष देऊन ऐकणार`, असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या या दोन दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. सत्तातंरानंतर एकमेकांविरुद्ध आक्रमक झालेले उद्धव आणि शिंदे गट या निमित्ताने खरी शिवसेना कुणाची? हे दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीवरील मेळाव्याला भाजपची रसद असणार आहे, तर ठाकरेंच्या शिवतीर्थावरील सभेला निष्ठावंतांची गर्दी होईल, असा दावा केला जात आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच या मेळाव्या संदर्भात मिश्किल टिप्पणी केली होती. प्रसार माध्यमांना उद्देशून तुम्ही आता कोणाचा मेळावा दाखवणार, तुमची धावपळ होईल असा, टोला लगावला होता.

त्यानंतर जालना येथे बोलतांना रावसाहेब दानवे यांना दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कोणाची सभा ऐकणार? असा प्रश्न विचारला गेला. यावर हजरजबाबी दानवे यांनी आपण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही सभा ऐकणार आहोत आणि लक्ष देऊन ऐकणार आहोत असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT