Gangakhed Bazar Samiti Results
Gangakhed Bazar Samiti Results Sarkarnama
मराठवाडा

Bazar Samiti Results : गंगाखेड बाजार समितीत रत्नाकर गुट्टेंना धक्का; 18 पैकी 11 जागांवर महाआघाडीचे उमेदवार वियजी

सरकारनामा ब्यूरो

Parbhani : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकालही समोर आला आहे. यामध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टेंना मोठा धक्का बसला आहे. 18 पैकी 11 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार वियजी झाले आहेत. तर रत्नाकर गुट्टे यांच्या गटाने 7 जांगावर विजय मिळवला आहे.

गंगाखेड विधानसभा मतदार संघातून रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे सत्ताधारी आमदार असूनही रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.

दरम्यान, परभणीतील सात बाजार समित्यांसाठी मतमोजणी सुरु असून परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा, बोरी आणि ताडकळस या सात बाजार समित्यांच्या कारभाऱ्यांचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे आता या बाजार समित्यांवर कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT