Mumbai : गद्दारांना आता परतीचे दरवाजे बंद झाले आहेत, असे सांगणाऱ्या संजय राऊत यांनी आमची चिंता करू नये. (Sanjay Shirsat on Sanjay Raut News)उलट त्यांच्याकडे असलेले आमदार, खासदार त्यांनी सांभाळेवत, नाहीतर उद्या ते गेले म्हणून त्यांच्यावरही तुम्ही गद्दारीचा शिक्का माराल, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलतांना संजय शिरसाट यांनी राऊतांच्या विधानावर भाष्य केले.
गजानन किर्तीकर यांना भाजपने घेतलेली एक भूमिका खटकली होती. त्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली हे खरे आहे, पण त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशा वावड्या जर कुणी उठवत असेल तर ते मुर्ख आहेत, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी लोकसभेच्या २२ जागा आमच्याच असा दावा केल्यानतर भाजप आणि शिंदे गटात सगळं काही अलबेल नाही, अशा चर्चा सुरू झाल्या.
यावर संजय राऊत (Sanjay raut) यांनी गद्दारांना आता पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही, त्यांच्यासाठी दरवाजे बंद झाले आहेत, असे विधान केले होते. यावर संजय शिरसाट यांनी राऊतांना सुनावले. (Shivsena) शिरसाट म्हणाले, राऊत यांनी आमची चिंता करू नये, उलट त्यांच्याकडे जे आमदार, खासदार शिल्लक आहेत, तेच आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते कधी आमच्याकडे येतील याकडे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांना सांभाळलं पाहिजे.
नाहीतर उद्या पुन्हा तुमच्यावर गद्दार म्हणून बोंबा मारण्याची वेळ येईल. राज्यातील विकास प्रकल्पांना विरोध करणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी ओरड सातत्याने केली गेली. परंतु मुंबईचे महत्व कधीही कमी झाले नाही. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे काहीजणांना पोटशुळ उठला आहे.
त्यामुळे पुन्हा अशा चर्चांना उधाण येईल. १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष नियमानूसार आणि कायद्याने निर्णय घेतली. ते स्वतः वकील असल्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेची घटना त्यांनी मागवून घेतली आहे. सर्व अभ्यास करूनच ते निर्णय देतील, असा विश्वास देखील शिरसाट यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.