Congress MP Ravindra Chavan Reaction On Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikars Controversy Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan V/s Pratap Patil Chikhlikar : चव्हाण-चिखलीकर यांचा खेळ नांदेडकर ओळखून; सत्तेसाठी पुन्हा गळ्यात गळे घालतील! खासदार रविंद्र चव्हाणांची टीका

MP Ravindra Chavan Reaction On Chavan-Chikhlikar Controversy नांदेडची जनता या दोघांना चागंलीच ओळखून आहे. त्यांच्या या खोट्या भांडणाला मतदार यावेळी भूलणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Jagdish Pansare

  1. काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी नांदेडच्या राजकारणात मोठा दावा करत म्हटलं की, "अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांचा खेळ नांदेडकरांनी ओळखला आहे."

  2. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नांदेडमधील काँग्रेस व भाजप गटात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे.

  3. या विधानानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नांदेडमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Nanded Political News : नांदेड जिल्ह्यातील दोन नेते खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या एकमेकांवर तुटून पडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आणि प्रचाराला सुरूवात झाली असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील मित्रपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. गेली वर्षभर शांत असलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे आता शिंगावर घेण्याची भाषा करू लागले आहेत. गेल्या महिनाभरापासून दोघेही टीकेचे फटाके फोडताना दिसत आहेत.

एकमेकांचे पारंपारिक राजकीय विरोधक शत्रू म्हणून चव्हाण-चिखलीकर नांदेडमध्ये ओळखले जातात. सध्या दोघेही सत्ताधारी पक्षात असले तरी त्यांच्यात सुरू असलेला वाद, आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा म्हणजे नाटक असल्याची टीका काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. अशोक चव्हाण-चिखलीकर यांचा हा खेळ नांदेडकर चांगलाच ओळखून आहेत. निवडणुका आल्या की एकमेकांना शिव्या घालायच्या आणि नंतर गळ्यात गळे घालायचे हे आम्हाला नवीन नाही.

नांदेडची जनता या दोघांना चागंलीच ओळखून आहे. त्यांच्या या खोट्या भांडणाला मतदार यावेळी भूलणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही रविंद्र चव्हाण म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने ज्यांना पद, प्रतिष्ठा, राज्याचे नेतृत्व करण्याची एकदा नव्हे तर दोनवेळा संधी दिली ते सत्तेसाठी काँग्रेस सोडून गेले. लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या महायुतीला भोगावे लागले.

वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस नेत्याला नांदेडच्या जनतेने निवडून दिले. पण दुर्दैवाने त्यांचे काही महिन्यातच निधन झाले. पक्षाने मला उमेदवारी दिली, मतदारांनी पुन्हा मला निवडून देत काँग्रेस पक्षावर चव्हाण कुटुंबावर विश्वास दाखवला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. लोकसभेत मिळाले तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळेल, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

भांडतील अन् पुन्हा एकत्र येतील..

अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे दोन नेते सध्या एकमेकांवर टीका करत आहेत. परंतु नांदेडकरांसाठी हे नवे नाही. निवडणुका आल्या की हे दोघे भांडल्यासारखे करतात. चिखलफेक करत मतदारांची आणि नांदेडच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता लोक हुशार झाली आहेत. त्यांना ही सगळी नाटक कळतात. मतांसाठी भांडण करायची आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र यायचे असा प्रकार आता नवा नाही. आज भांडणारे अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र आलेले दिसतील, असा दावाही रविंद्र चव्हाण यांनी केला.

FAQs

1. रविंद्र चव्हाण यांनी नक्की काय वक्तव्य केले?
→ त्यांनी म्हटलं की, "नांदेडकर आता अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांचा खेळ ओळखत आहेत."

2. हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर आले?
→ नांदेडच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

3. यामुळे महायुतीवर काय परिणाम होईल?
→ या वक्तव्यामुळे महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद अधिक उघड झाले आहेत.

4. प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात नेमकं काय वाद आहे?
→ दोघांमधील राजकीय प्रतिस्पर्धा आणि मतदारसंघातील वर्चस्व यावरून वाद वाढले आहेत.

5. नांदेडमधील मतदारांची प्रतिक्रिया काय आहे?
→ मतदार वर्गात चव्हाण यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली असून काहीजण त्यांच्या समर्थनार्थ, तर काहीजण विरोधात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT