Aurangzeb's tomb Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : राजकारण तापलं! छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढा: शिरसाटांची मागणी

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतराविरोधात एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध दर्शवण्यासाठी सुरू झालेल्या साखळी उपोषणात औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यामुळे खळबळ उडाली होती. यावरुन आता राजकारण तापू लागलं आहे.

असे असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठी वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाजी कबर काढून टाका, अशी मागणीच शिरसाट यांनी केली आहे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचही शिरसाटांनी म्हटलं आहे. यामुळे नव्या वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचे सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे ते लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरत आहे. शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्याचं वाईट वाटायचं काय कारण, असा सवालही शिरसाटांनी केला आहे. तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे. उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या इथं नको.ही कबर काढून घ्यावी, अशी मागणी आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT