Suman Patil, Rohit patil, Sanjaykaka Patil  Sarkarnama
मराठवाडा

Rohit Patil News : ...तर गाठ माझ्याशी; रोहित पाटलांचा संजयकाकांना इशारा

Sachin Waghmare

Sangli News : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याची तयारी गेल्या काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दुसरीकडे जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता सांगलीच्या कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला दम दिल्याने रोहित पाटलांनी माजी खासदार संजयकाका पाटलांना इशारा दिला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले असतानाच कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील (Rohit Patil) व माजी खासदार संजयकाका पाटलांच्या (Sanjaykaka Patil) कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे रोहित पाटलांनी इशारा दिला आहे. या ठिकाणच्या नगरपंचायत निवडणुकीवरून माजी खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्या कार्यकर्त्यातील वाद चांगलाच रंगला आहे. (Rohit Patil News)

काय करायचे ते विधानसभा निवडणुकीपर्यंत करून घ्या. विधानसभेनंतर तुम्हाला काही करायला देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटलांनी भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिला. त्याच बरोबर यापुढे कार्यकर्त्याच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा देखील रोहित पाटलांनी दिला.

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये आयोजित निषेध सभेमध्ये ते बोलत होते. कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT