मराठवाडा

Palam Bazar Samiti Result: पालम बाजार समितीवर रासप-शिंदे गटाचा झेंडा; मविआला ४ तर भाजप भुईसपाट

सरकारनामा ब्युरो

Palam Bazar samiti Result: पालम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने बाजी मारली. पालम बाजार समितीत रासप आणि शिवसेना (शिंदे गट) आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर रासपच्या आघाडीने सत्ता मिळवली. महविकास आघाडीला मात्र केवळ ४जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला या निवडणुकीमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. (RSP-Shinde Group Wins Palam Bazar Committee; Maha Vikas Aghadi has 4 seats and BJP has zero seats)

पालम कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून शेतकरी विकास आघाडी आणि महाविकास आघाडी कडून बळीराजा विकास पॅनल व भाजपाच्या शेतकरी विकास पॅनलच्या अशा एकूण तीन पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनही पॅनलनी निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली होती. अखेर या निवडणुकीत रासापाच्या शेतकरी विकास आघाडीने या निवडणुकीमध्ये १४ जागा जागांवर दणदणीत विजय मिळवला. (Parbhani Bazar Samiti Election Result)

तर सर्वसाधारण गटातून गजानन गणेश रोकडे यांना २७६ प्रल्हाद विक्रम काळे २१३, काळे शामराव दतराव २०७, मोतीराम रावसाहेब खंडागळे २०१, रमेश माधवराव गायकवाड २०१, भाऊसाहेब शिवाजी पोळ २४६ मते मिळाली. तर राखीव महिला मतदारसंघातून ज्योती भूपेंद्र पाटील २३६, छाया शिवाजी राऊत २३२, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून खेडकर महादेव नागनाथ २४२, भटक्या यामध्ये उंदरे किशनराव २६६ मते पडली. ग्रामपंचायत मतदार संघातून अतुल रामचंद्र धुळगुंडे १७९, गणेश विठ्ठलराव हत्तीआंबिरे २०६, हमाल मापाडी गटातून ज्ञानेश्वर पांडुरंग घोरपडे ४५, तर व्यापारी गटातून भारत प्रभाकर सिरस्कार १०८, अशा एकूण १४ जागांवर रासप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने विजय मिळवला. (Marathwada bazar samiti Election Result)

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने स्थापन करण्यात आलेल्या बळीराजा विकास पॅनलला चार जागेवर यश प्राप्त करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण सहकारी मतदार संघ मधून तुषार काशिनाथ दुधाटे यांना २४६ मते सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून कमल किशन काळे १७४ आर्थिक दुर्बल घटक मध्ये विष्णुदास नारायण शिंदे २३८ व्यापार मतदारसंघातून दीपक रामराव रुद्रवार यांना 108 मते घेत विजय संपादित करत ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे तर या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी विकास आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

महाविकास आघाडीच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या बळीराजा विकास पॅनलला चार जागेवर यश प्राप्त करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण सहकारी मतदार संघामधून तुषार काशिनाथ दुधाटे यांना २४६ मते, सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून कमल किशन काळे १७४, आर्थिक दुर्बल घटक मध्ये विष्णुदास नारायण शिंदे २३८, व्यापार मतदारसंघातून दीपक रामराव रुद्रवार यांना 108 मते मिळाली. निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी विकास आघाडीला मात्र एकही जागा मिळवता आली नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT