लातूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारचा सध्या कारभार हा औरंगजेबासारखाच सुरू असल्याची टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाने सामान्य जनतेवर जिजिया कर आकारून त्यांचे शोषण केले होते, तसाच कारभार राज्य सरकारचा सुरू आहे. (Latur) रोम जळत असतांना तिथला राजा जसा फिडल वाजवत होता, तीच परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली असल्याची टीकाही खोत यांनी केली.
लातूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी आणि जनतेशी काही घेणेदेणेच राहिलेले नाही. कधी काळी औरंगजेबाचा जसा अंदाधुंद कारभार होता, तसाच सध्या सुरू आहे.
औरंगजेबाची भाषा, वर्तुणूक, कायदा आणि आताच्या उध्दव ठाकरे यांच्यामध्ये काहीही फरक नाही. औरंगजेबाने ज्याप्रमाणे जिजिया कर लावून जनतेचे शोषन केले, तसाच राज्याचा कारभार सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि रोमचा राजा रोम जळत असताना बिगुल वाजवत होता तशी परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली असल्याचेही खोत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे विधान केल्याचे सांगत खोत यांनी पवार यांच्यावरही टीका केली. पवारांनी आपला पुतण्या, मुलगी आणि नातवाला हे सांगितल पाहिजे. त्यांनी राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने खाजगी करून का चालवायला घेतले?
उसावर राजकारण करत सत्ता मिळवली आणि आता ऊस आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे अस म्हणता. मग आपला पुतण्या, मुलगी आणि नातवाला इतर पिकांकडे वळायला का सांगितले नाही, असा टोला देखील खोत यांनी लगावला. यापुर्वी जालना जिल्ह्यातील शेतकरी संवाद यात्रे दरम्यान देखील खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिल्लरवाला असा उल्लेख केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.