Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics : माझ्या कातडीचे जोडे...; संभाजी पाटील-निलंगेकर भावूक

Sambhaji Patil Nilangekar Get Emotional in Latur : संभाजी पाटील-निलंगेकर का झाले भावूक?

राम काळगे

Sambhaji Patil Nilangekar News :

मागील तेवीस वर्षांच्या काळात मतदारसंघातील जनतेने आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदानरूपी दिलेल्या अशीर्वादाचे उपकार माझ्या कातडीचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी फिटणार नाही, असे भावनिक अवाहन माजी मंत्री Sambhaji Patil Nilangekar यांनी केले. त्यामुळे मेळाव्यासाठी आलेले शेतकरीही भावूक झाले होते.

निलंगा बाजार समितीकडून कै. डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा ऊहापोह केला. बाजार समिती निवडणुकीत भाजपमध्येच दोन गट पडले होते. अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतःच्या नावाने पॕनेल करून मतदारासमोर गेले. आमचा कोणत्याही परस्थितीत पराभव झालाच पाहिजे म्हणून लातूरवरून खास ताकद निलंग्यात लावली गेली. केवळ मला निलंग्यात रोखून पराभव करणे हाच त्यांचा उद्देश होता, असा टोला त्यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे नाव न घेता लगावला. शिवाय मतदारांनी आम्हाला अशीर्वाद देऊन लातूरपेक्षा अधिक मतांनी निवडून दिले. त्यामुळे किती उपकार सांगावे तितके कमी आहेत, असे ते म्हणाले.

सन 2003 पासून मी राजकारणात आहे. मतदारसंघ सोडून निवडणूक लढवण्याची कार्यकर्ते इच्छा व्यक्त करीत आहेत. पक्षाकडूनही निवडणुकीच्या जबाबदारीसाठी अनेक बैठका सुरू आहेत, परंतु या मातीमुळे व जनतेच्या अशीर्वादामुळे कल्पनेच्या पुढे संधी मिळाली. यामुळे मातीतील जनतेची सेवा करणे ही आपली प्राथमिकता राहील, असे सांगून त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघ अथवा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबतच्या वेगवेगळ्या चर्चेला पूर्णविराम दिला.

बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या हिताला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ऊस कारखानदारीच्या वजनाचे माप असो यामध्ये काटा मारून माप करणे म्हणजे महापाप आहे. शेतकऱ्यांच्या निष्पाप विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असे सांगून राज्यातील बाजार समित्यांचा विकास साधण्यासाठी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांना बळ देणारी बाजार समिती निर्माण करावी, असे अवाहन त्यांनी केले. राज्यातील कारखान्यांचे गाळप यंदा पाण्याच्या टंचाईमुळे लवकर सुरू करावे, असा आग्रह धरल्याने शासनाने 20 नोव्हेंबरऐवजी 1 नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याची परवानगी दिली. तरीही आज मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप सर्वच कारखाने करत आहेत. ऊस लागवड अधिक असल्याने ऊस शिल्लक राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

गेल्या 23 वर्षांच्या राजकारणात मोठे करण्याचे काम या भागातील शेतकऱ्यांनी व मतदारांनी केले. आम्हाला खूप मोठे केले आहे. त्यांचे ऋण आम्ही अथवा आमचे कुटुंब कदापि फेडू शकत नाही, असेही संभाजी पाटील निलंगेकर यांनी या वेळी सांगितले.

edited by sachin fulpagare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT