Mp Imtiaz Jalil, Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

संभाजीनगर, धाराशिवची गुगलला घाई! इम्तियाज जलील यांनी मागितले स्पष्टीकरण

इतिहासाचे संदर्भ देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दोन शहरांना संभाजीनगर आणि धाराशिव म्हणायला सुरवात केली. शिवसेना पक्षाची तीच भूमिका कायम राहिली. ( Mp Imtiaz Jalil)

अतुल पाटील

औरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार? हे अद्याप स्पष्ट नसताना गुगलनेही या दोन्ही जिल्ह्याच्या नावामध्ये बदल केला आहे. (Aurangabad) तसे बदल गुगल सर्चमध्ये दिसत आहेत. दोन्ही ऐतिहासिक शहरे असल्याने याबाबत आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

गुगलच्या आधी काही दिवसांपुर्वीच क्रोमा या कंपनीनेही औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे. यावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनीही प्रश्‍न उपस्थित केला आहे. गुगलला टॅग करत ट्विटद्वारे, औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे, हे तुम्ही स्पष्ट करू शकता का? तसेच, ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचे गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी इम्तियाज यांनी केली आहे. (Marathwada)

इतिहासाचे संदर्भ देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दोन शहरांना संभाजीनगर आणि धाराशिव म्हणायला सुरवात केली. शिवसेना पक्षाची तीच भूमिका कायम राहिली. २०१९ मध्ये अस्तित्वात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारतर्फे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुन २०२२ मध्ये नाव बदलाचा निर्णय घेतला.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडादरम्यान, मंत्रीमंडळाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या नावाला स्थगिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा नावांचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याची प्रतिक्षा असतानाच गुगलने या दोन्ही शहरांची नावे बदलली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT