Chhatrapati Sambhajinagar Municipal Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Election: धक्कादायक! मतदारांची यादी तयार करून थेट पैशांचीच डील, अलर्ट नागरिकांनी डाव हाणून पाडला

Vote Buying Allegation News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत मतदारांची यादी तयार करून पैशांचे डील झाल्याचा आरोप उघडकीस आला. सुजाण नागरिकांनी हा डाव हाणून पाडत कारवाईची मागणी केली.

Jagdish Pansare

Municipal Corporation News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी (ता.13) सायंकाळी थंडावणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आता शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेदाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्ष्मीदर्शन घडवणाऱ्यांवर निवडणूक आयोगाचा वाॅच असला तरी ते होणारच असा ठाम विश्वास काही जणांना आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एका प्रभागात असाच एक प्रकार उघडकीस आल्याचे दिसून आले आहे.

प्रभागातील एका अज्ञाताने रजिस्टरच्या पानांवर नावे लिहून बनवलेली शेकडो मतदारांची एक यादी समोर आली. जी यादी दाखवून संबंधित व्यक्तीने थेट उमेदवाराशी डील करून प्रत्येक व्यक्तीच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप यादीत नाव असलेल्या काही लोकांनी केला. विशेष म्हणजे या यादीत हयात नसलेल्या लोकांचीही नावे असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या यादीचे पोस्टर बनवून संबंधित भागातील नागरिकांनी थेट आंदोलन करत आमच्या नावे पैसे गोळा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

याद्या तयार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी येथील लोकांनी एक नामी शक्कल लढवली. याद्या काढताना जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्या फोटो खाली घरातील फरशी स्पष्टपणे दिसते. ही फरशी कोणाच्या घरात लागलेली आहे याचा शोध घेत लोक तिथे धडकले आणि त्यांनी संबंधिताला जाब विचारला. सदर व्यक्ती घरात नसल्यामुळे संतापलेल्या लोकांनी आंदोलन सुरू केले. या प्रकाराने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आम्ही पैसे घेत नाही, जाब विचारतो..

पैसे घेणाऱ्यांची यादी म्हणून जी नावे समोर आली आहे, ती वाचून लोकांना धक्का बसला. या यादीत ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशा मुलांचा, मृत पावलेल्यांची नावेही नोंदवण्यात आली आहे. आपल्या नावाचा असा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्याने या प्रभागातील नागरिकांमध्ये संताप आहे. लोकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना आम्ही कधीही पैसे घेऊन मतदान करत नाही.

आम्ही सर्व नागरी समस्यांसाठी नगरसेवकाला जाब विचारतो. उद्या नगरसेवक निवडून आला आणि यादीत नाव असलेल्या लोकांना तुम्ही पैसे देऊन मत घेतले, मला जाब कसं विचारता, असं म्हटलं तरी आम्ही काय करायचे? अशा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT