MP Sadipan Bhumre-Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre On Water Issue : खासदार संदीपान भुमरे म्हणातात, पाणी योजना रखडली त्याला उद्धव ठाकरेच जबादार!

MP Sandeepan Bhumre blames Uddhav Thackeray for the delay in the water supply project in Sambhajinagar, citing mismanagement and lack of action. : उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नावर मोर्चा काढण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संदीपान भुमरे यांनी पाणीयोजना रखडली त्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला

Jagdish Pansare

Shivsena News : आमदार, खासदार, मंत्री, महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वर्ष सत्ता असूनही छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडवता आला नाही. 2018 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने मंजूर केलेली 1680 कोटींची रखडलेली पाणीपुरवठा योजना आता अडीच हजार कोटींवर पोहचली. तरीही संभाजीनगरकरांना दररोज पाणी मिळत नाहीये.

दहा-पंधरा दिवसांना नळाला पाणी येण्याला कोण जबाबदार? यावरून गेली अनेक वर्ष एकाच पक्षात सत्ता भोगलेले शिंदेसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या चांगलीच जुंपली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शहाराचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावरून आतापासूनच राजकारण सुरू झाले आहे. उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नावर मोर्चा काढण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संदीपान भुमरे यांनी पाणीयोजना रखडली त्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकांचे हे फळ आहे. त्यामुळे मोर्चा काढण्याआधी आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणजेच आपल्या वडिलांकडून जरा माहिती घ्यावी, असा टोलाही भुमरे (Sandipan Bhumre) यांनी लगावला. भुमरे यांच्या या आरोप आणि टीकेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी सरकारने महापालिकेला 800 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.

खासदार भुमरे यांनी तेच आणून दाखवावे, बाकी त्यांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत किती अभ्यास आहे, मला माहित नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी त्यांना लगावला. महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच सहा महिन्यात पाणी देऊ, असे सांगितले होते.

शिवसेनेचा महापालिकेत महापौर होता तेव्हा आम्ही शहराला तीन दिवसाआड पाणी द्यायचो, असा दावा करत अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. महापालिकेचा आठशे कोटी रुपयांचा वाटा सरकारकडून आणून दाखवा, मग बोला, असा चिमटा दानवे यांनी त्यांना काढला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT