Mla Sandeep Kshirsagar
Mla Sandeep Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

काकांचा शिलेदार फोडताच संदीप क्षीरसागर म्हणाले, पालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार

सरकारनामा ब्युरो

बीड : लोकांसमोर प्रामाणिक भूमिका घेवून जाण्याने लोक विश्‍वास ठेवतात. यापुढे कुठल्याही निवडणूका असो झेंडा तर राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचाच लागेल. यापुढे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका राहिल, बीड (Beed) नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर (Mla sandeep kshirsagar) यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे यांनी सोमवारी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. तांदळे यांनी क्षीरसागरांच्या होमपिच असलेल्या नवगण राजूरी जिल्हा परिषद गटातून संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती. त्या भागातील कणखर नेतृत्व मानले जाणारे वैजिनाथ तांदळे जयदत्त क्षीरसागर यांच्या जवळचे होते.

त्यांनी सोमवारी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार सुनिल धांडे, माजी आमदार सय्यद सलिम, माजी आमदार उषा दराडे, गजानन कारखान्याचे रविंद्र क्षीरसागर आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

संदीप क्षीरसागर म्हणाले, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मी आमदार होवू शकलो. येणार्‍या निवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि जनतेच्या आशिर्वादाच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकेल. पुर्वीप्रमाणे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. नवगण राजुरी आता वन साईड झाली असून इतर सर्कलमध्येही दिग्गजांचे प्रवेश होतील.

वैजिनाथ तांदळे म्हणाले, माझ्या गावात दर दिवसाला पाणी देतो परंतू पाणी उपलब्ध असतांना बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळते. शहरात घाणीचे साम्राज्य असून ही राजकारणतली घाण साफ करायची आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांना वंजारवाडीतून बिनविरोध ग्रामपंचायतीवर पाठविल्यानंतर त्या राजुरीच्या सरपंच झाल्या. तेंव्हापासून क्षीरसागर कुटुंबाशी माझे प्रेमाचे संबंध आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT