Sandip Kshirsagar Election Campaign rally in Beed 
मराठवाडा

Beed Assembly Election : जनतेच्या प्रत्येक मताचा उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी करणार : संदीप क्षीरसागर

Sandip Kshirsagar election campaign speech : तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याची ग्वाही संदीप क्षीरसागर यांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

बीड : जनता हीच खरी आमची ताकद असून विरोधकांच्या अपप्रचाराला सूज्ञ जनता कधीही थारा देणार नाही. बीड मतदार संघातील जनता खासदार शरद पवार यांच्या सोबत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कितीही आरोप केले तरी त्यांना थारा न देता मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याची ग्वाही, आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

पाली व मांजरसुंबा येथे प्रचार बैठकीत ते बोलत होते. गुरुवारी (ता. १४) संदीप क्षीरसागर यांनी तालुक्यातील पाली, मांजरसुंबा या गावांचा दौरा करत कॉर्नर बैठकीत मतदारांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.

त्यांच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. पाली व मांजरसुंबा येथील संवाद बैठकीत बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, बालाघाटवरील जनता नेहमीच शरद पवार यांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. जेंव्हा लोक एखाद्या भूमिकेसोबत एकनिष्ठ असतात तेंव्हा नक्कीच इतिहास घडतो. बालाघाटवरील जनता यावेळी नक्की इतिहास घडवेल, असा विश्वास आहे.

प्रलंबित विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन आरोप करत आहेत. मात्र माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्‍वास कमावलायं, त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. यावेळी त्यांनी गत पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT