Grampanchayt News : राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर अचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Paithan बिडकीन येथे प्रचाराची वेळ संपल्यानंतर भुमरे यांनी सायंकाळी साडेपाच वाजता शिंदे गटाच्या पॅनलची बैठक घेवून प्रचार केल्याचा आरोप विरोधी पॅनलच्या दत्ता गोर्डे यांनी केला होता. यावर संदीपान भुमरे यांनी आपण प्रचाराला नाही, तर लग्नाला गेलो होतो, तिथे फक्त चहा पिला, मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असा खुलासा केला आहे.
पैठण तालुक्यात भुमरे यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता गोर्डे यांनी भुमरे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. (Grampanchayt Election) बिडकीन येथे काल ग्रामपंचायतीचा प्रचार सायंकाळी संपला असतांना भुमरेंनी बिडकीन येथे बैठक घेऊन शिंदे गटाच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन केल्याचा आरोप करण्यात आला. (Marathwada)
आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात कुठलाही शासकीय बंदोबस्त किंवा वाहने घेवून जाता येत नाही, परंतू मंत्री महोदय आपल्या लवाजाम्यासह बिडकीनमध्ये आले, शिंदे गटाच्या पॅनलचा प्रचार केला, असेही गोर्डे यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.
यावर भुमरे यांनी खुलासा केला असून, आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार केला नाही. बैठकही घेतली नाही, एका लग्नासाठी मी आलो होतो, तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर चहा पिला आणि तिथून निघून गेलो. मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.
भुमरे यांच्या तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या तालुक्यातील ७ पैकी ग्रामपंचयती भुमरे यांच्या ताब्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या टप्यात सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी भुमरेंनी शक्तीपणाला लावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.