Sandipan Bhumre appeals to Devendra Fadnavis to retain the Water Resources Department Chief Engineer office in Chhatrapati Sambhajinagar instead of shifting it to Nanded. Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगरचे महत्त्वाचे शासकीय कार्यालय नांदेडला जाणार? बातमी कळताच शिवसेना खासदाराचे देवाभाऊंना साकडे

Sambhajinagar Water Resources Office : संभाजीनगरमधील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय नांदेडला हलवण्याच्या प्रस्तावाला खासदार संदीपान भुमरे यांनी विरोध केला असून ते कार्यालय संभाजीनगरमध्येच कायम ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Jagdish Pansare

Shivsena News : गेल्या 50 ते 60 वर्षांपासून कार्यरत असलेले जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयाला स्थानिक स्तरावर विरोध होत आहे. हे कार्यालय संभाजीनगर येथेच कायम ठेवावे, या मागणीसाठी खासदार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मुख्यालय असून, विभागाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथून सर्व जिल्ह्यांमध्ये पोचण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. उच्च न्यायालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महसूल विभाग आणि जलसंधारण महामंडळ यांसारखी महत्त्वाची प्रादेशिक कार्यालये येथेच असल्याने प्रकल्पांच्या अडचणी सोडवण्यासाठी परस्पर समन्वय साधणे सोयीचे होते.

कार्यालय हलवल्यास हा समन्वय विस्कळित होईल, अशी भीती भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली. नवीन ठिकाणी कार्यालय उभारण्यासाठी इमारत, फर्निचर आणि तांत्रिक साधनांवर मोठा खर्च होईल, ज्यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक ताण पडेल. सद्यस्थितीत संभाजीनगरमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

येथील शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांची कुटुंबे आणि मुलांचे शिक्षण येथे स्थिर झाले आहे. अचानक होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागेल. या प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणारे दोन विभागीय कार्यालये आणि 9 उपविभाग नाशिक येथे स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे.

तसेच 19 उपविभागीय कार्यालये बंद करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मराठवाड्याचा सिंचन अनुशेष पूर्ण करण्यासाठी हे विभाग मोलाचे कार्य करत असताना, ते बंद करणे किंवा स्थलांतरित करणे, हा या क्षेत्रावर अन्याय ठरेल, असेही भूमरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT