Sandipan Bhumre, Uddhav Thackeray News, Aurangabad
Sandipan Bhumre, Uddhav Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : ज्या ठाकरेंविरोधात बंड केले, आता त्यांनाच पक्षात येण्याची ऑफर

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा, आमदाराचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर टीका करतांना ते सुसाट सुटले आहेत. रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी तर आता उद्धव व आदित्य ठाकरे यांनाच पक्षात येण्याची ऑफर देत डिवचले आहे. ज्या ठाकरेंच्या विरोधात बंड केले, त्याच ठाकरेंना आता आमच्या शिवसेनेत या, असे म्हणत भुमरेंनी टोला लगावला आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदेगटाकडून राज्यभरात जल्लोष सुरू आहे. सोशल मिडियावर एकमेकांविरोधात भिडलेले कार्यकर्ते आता मैदानावरही राडा घालत आहेत. दुसरीकडे शिंदेंचे (Eknath Shinde) मंत्री, आमदार ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. संदीपान भुमरे यांनी त्या पक्षात आता फक्त बाप-लेकच शिल्लक राहिल्याची टीका केली.

भुमरे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे, या निकालाने आता ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार, खासदार देखील लवकरच आमच्याकडे येतील. त्यामुळे त्या पक्षात आता फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे दोघेच राहतील. त्यांनी देखील आता आमच्या पक्षात यावे. आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष, गट राहिलाच नाही.

जो निकाल आला आहे, तो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला आहे. धनुष्यबाण निशाणी आपल्यालाच मिळणार याचा आम्हाला विश्वास होता. ४० आमदार, १३ खासदारसह १० अपक्ष आमदार अनेक नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत सहभागी झाले होते. त्यामुळे आम्हाला खात्री होती की, धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. शिवसेना ठाकरेंचीच आहे, पण ती बाळासाहेब ठाकरेंची असेही भुमरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT