Sangeeta Thombare meets Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

Sangeeta Thombare : संगीता ठोंबरेंचे विधानसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न? जयंत पाटलांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Sangeeta Thombre meets Jayant Patil : भाजपच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Datta Deshmukh

Beed News, 04 August : भाजपच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची सुत्रांची माहिती आहे.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही पक्षकार्यालयात नुकतीच भेट घेतली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना 2012 च्या पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली होती.

त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पृथ्वीराज साठे यांच्याकडून प्रा. संगीता ठोंबरे पराभूत झाल्या. मात्र, पुढच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या भाजपच्या उमेदवारीवर आमदार झाल्या. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारून नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरविले होते.

आता पुन्हा त्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात केज व अंबाजोगाईला पत्रकार परिषद घेऊन निवडणुक लढविण्याचे जाहीर केले. मांजरा धरणात 3 टीएमसी पाणी आणणे, एमआयडीसी उभी करणे, सूत गिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीसाठी प्रयत्न असे नवे व्हिजन घेऊन आपण पुन्हा राजकीय मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगीतले.

105 गावांचा दौरा करुन जनभावना समजून घेतल्या असून केज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे (BJP) दावेदारी करणार असल्याचे संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) यांनी म्हटले आहे. एकीकडे भाजपकडून उमेदवारी मागणार असल्याचं सांगणाऱ्या ठोंबरे यांनी शरद पवारांच्या पक्षाकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती आहे.

अशातच आता त्यांनी जयंत पाटील (Jaynat Patil) यांची भेट घेतली आहे. सदर भेट राजकीय नसून पक्षप्रवेशाची चर्चा झाली नसल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्या कामासंदर्भात भेटल्याचंही पाटील म्हणाले असले तरीही आता पाटील सत्तेतही नाहीत, त्यामुळे ही भेट उमेदवारीसाठीच्या प्रयत्नासाठीचं असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यान त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या भूमिकांनाही पाठींबा दिलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT