Municipal Commissinoer G.Shrikant News Sarkarnama
मराठवाडा

G. Shrikant News : कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्याचे घर गाठत प्रशासकांनी दिली तंबी..

Chhatrapati Sambhajinagar : शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप ऐकून ते संतापले.

सरकारनामा ब्युरो

Municipal Corporation : महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेक भागात सफाई कर्मचारी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याची मागणी करत आहेत. ( G. Shrikant News) नागरिक मात्र विरोध करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर कचरा फेकणे, असे प्रकार करत आहेत. मंगळवारी सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्याला प्रशासकांनी त्याच्या घरी जाऊन जाब विचारला.

ओला सुका कचरा वेगवेगळा द्यावाच लागेल, अशी ताकीदही दिली. (Aurangabad) प्रशासक जी. श्रीकांत यांनी संभाजीनगर शहराला इंदूरप्रमाणे स्वच्छ करण्यासाठी `हम होंगे कामीयाब`, अभियान सुरू केले आहे. (Municipal Corporation) त्यानुसार एक ऑगस्टपर्यंत शहराच्या प्रत्येक भागात कचऱ्याचे वर्गीकरण १०० टक्क्यापर्यंत पोचले पाहिजे, ज्या भागात शंभर टक्के वर्गीकरण होणार नाही, त्या भागातील अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येईल, असा इशारा श्रीकांत यांनी दिला.

जे नागरिक ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करणार नाहीत, त्यांचे एक ऑगस्टपर्यंत प्रबोधन करा, त्यानंतर त्यांचा कचरा उचलू नका, दंडात्मक कारवाई करा, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (Marathwada) त्यानुसार घंटागाड्यावरील कर्मचारी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याचे आवाहन केले जात आहे. पण काही भागात त्याला कडाडून विरोध केला जात आहे.

सोमवारी एका कर्मचाऱ्यावर कचरा फेकण्यात आला. त्यानंतर प्रशासकांनी त्या भागात जाऊन स्वतः कचऱ्याचे वर्गीकरण करून दाखविले. एका भागात सफाई मजुराला फोनवरून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार श्रीकांत यांच्या कानावर आला. शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप ऐकून ते संतापले. त्यांनी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला घेऊन थेट शिवीगाळ करणाऱ्याचे घर गाठले.

प्रशासक दारात येताच संबधिताची पाचावर धारण बसली. त्याने पत्नीला समोर केले. त्याच्या पत्नीने ते घरात नाहीत, असे कारण दिले. त्यावर प्रशासकांनी त्यांना सांगा माझ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करायची नाही. कचरा वेगवेगळा देण्यात तुमच्या अडचणी असतील त्या मला सांगा, मी त्यावर निर्णय देतो. पण यापुढे कचरा वर्गीकरण करूनच द्यायचा, अशी तंबीही दिली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT