Sanjay Raut notice by High Court : न्यायालय व न्यायालयीन प्रक्रियेवर अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे सेनेचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह काही माध्यम समुहांना हायकोर्टानं नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. सी. मोरे व न्या. वैशाली जाधव-पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ॲड. अमित देशपांडे यांनी ॲड. शैलेंद्र गंगाखेडकर यांच्यामार्फत फौजदारी अवमान याचिका दाखल केली आहे.
या याचिकेनुसार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि एकूणच न्यायव्यवस्थेविषयी विविध माध्यमांवर अनेकवेळा अवमानकारक वक्तव्य केले आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या अवमानाविषयी राज्याचे तत्कालीन महाधिवक्ता यांचेकडे संजय राऊत व इतर यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात कायद्यान्वये संमती मागितली होती.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा विचार करून राज्याचे विद्यमान महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी अँड अमित देशपांडे यांना फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात परवानगी दिली. त्या अनुषंगाने ॲड अमित देशपांडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका ॲड. शैलेंद्र गंगाखेडकर यांचे मार्फत दाखल केली.
संजय राऊत यांनी केलेली अवमानकारक विधाने प्रकाशित करणाऱ्या काही माध्यमांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.