Chhatrapati Sambhajinagar News 09 Jan : 'भगव्याची शान राखलीच गेली पाहिजे, पण ती राखायची असेल तर धनुष्यबाण हवाच, बाणाशिवाय तु्म्ही भगव्यावर चाल करून येणाऱ्यांचा नायनाट करू शकणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'ना बान, ना खान राखू भगव्याची शान'या वक्तव्याला उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांचा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉक शो झाला. यावेळी हिंदुत्वावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी वरील नारा दिला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर लढत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटण्यास शिवसेनेचे नेते आणि त्यांच्यातील वादच जबादार असल्याचे सांगत खापर फोडले.
एवढेच नाही तर महापालिका निवडणुकीत ना खान, ना बाण, राखू भगव्याची शान म्हणत, शिवसेनेलाही डिवचले. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा नारा या संदर्भात भाष्य केले. भगव्याची शान राखली गेलीच पाहिजे, पण त्यासाठी धनुष्यबाण हाती असलाच पाहिजे. धनुष्यबाण हाती नसेल तर शत्रूचा नायनाट करता येणार नाही.
त्यामुळे आम्ही भगव्याची शान राखू आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आणि आमचाच महापौर बसेल असा दावाही संजय शिरसाट यांनी केला. फडणवीस यांनी काल आपल्या मुलाखतीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असेल आणि आमच्या मित्रपक्षांना मागेमागे यावे लागेल, असा दावा केला होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरे यांच्याशी केलेली युती ही मजबुरीत केलेली आहे. ज्यांच्यामागे कोणी नाही, त्यांच्यासोबत राज ठाकरे गेले आहेत, याचे त्यांना किती नुकसान होईल हे लवकरच दिसेल. मुंबई, ठाण्यात आम्ही नियोजनपद्धतीने प्रचार करत आहोत, आमची तयारी वर्षभरापासून सुरू आहे.
आम्ही कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत आहोत, असा दावा राज ठाकरे यांच्याकडून केला जातोय. परंतु कोपऱ्यात गेल्याने त्यांच्या जागा निवडून येतील, असे मानने चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे राज ठाकरे यांना नुकसान होईल, असही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.