Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Ambadas Danve : "पैसे देऊन ज्यांना तिकीटे दिली, तेच आता तुमची गाढवावरून धिंड काढतील!"; शिरसाटांनी दानवेंना सुनावले खडेबोल

Sanjay Shirsat Attacks Ambadas Danve Over Ticket Controversy : तिकीट वाटपातील पैशांच्या आरोपांवरून संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंना खडेबोल सुनावत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली.

Jagdish Pansare

Shivsena News : पद नाही, काही काम नाही मग माझे नाव घेतले की प्रसिद्धी मिळती म्हणून काहीही आरोप करायचे असा धंदा सध्या अंबादास दानवे यांच्याकडून सुरू आहे. उबाठाच्या उमेदवारांना म्हणे मी फोन करून धमकावले. पुरावे असतील तर द्या, उगाच आरोप करू नका. अधिकाऱ्यांनी धमकावल्याचे सांगता, मग त्याचं नाव का घेत नाही? असा सवाल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला. गाढवावरून अधिकाऱ्यांची धिंड काढणाऱ्या अंबादास दानवे यांनी ज्यांना पैसे घेऊन तिकीटं विकली, आता तेच तुमची गाढवावरून धिंड काढतील, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी पालकमंत्री संजय शिरसाट हे स्वतः फोन करत असल्याचा आरोप काल अंबादास दानवे यांनी केला होता. यात निवडणुक विभागातील काही अधिकारीही सहभागी आहेत, असा दावा त्यांनी केला होता. यावर संजय शिरसाट यांनी आज भाष्य केले. अशा धमक्या देऊन उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जात नाहीत.

काही पद नाही, म्हणून माझ्या नावाचा वापर केला जातो. अंबादास दानवे यांनी आता ज्या रशीद मामूला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे, त्यांच्या प्रचार करावा, मामू जिंदाबादच्या घोषणा द्याव्यात, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. फक्त संजय शिरसाटला टार्गेट करणे हाच यांचा उद्धस आहे. दम असेल तर पुरावा द्या, अधिकाऱ्याचे नाव सांगा असे आव्हानही त्यांनी दिले.

बिनविरोधवरून बोंबाबोंब कशाला?

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक आयोग चौकशी करणार आहे याकडे संजय शिरसाट यांचे लक्ष वेधण्यात आले. एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला तर विरोधकांनी बोंबाबोंब करण्यापेक्षा आपल्या उमेदवारांना विचारले पाहिजे, की बाबा रे तू माघार का घेतली? चौकशीत चुकीचे निघाले तर निश्चित कारवाई होईल. बिनविरोध येऊ नये असे नाही, ज्यांची ताकत, कुवत नाही, उमेदवार मिळत नाही ते बोलत आहेत.

निवडणूक आयोग ठरवेल, आणि मग यांची नंतर निवडणूक आयोगा विरुद्ध आरोप करण्यापर्यंत मजल जाईल, असा टोलाही शिरसाट यांनी विरोधकांना लगावला. निवडणूक आयोगावर नेहमीच आरोप केले जातात, निवडणूक आयोग काय तुमचे नोकर आहेत का? निवडणूक आयोग ही यंत्रणा स्वतंत्र आहे. 56 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यावर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला विचारून चौकशी करा, तुम्हाला लोक लाइक करत नाही हे यातून सिद्ध झाले आहे, असेही शिरसाट म्हणाले.

एमआयएम तोडपाणी करणारा पक्ष..

संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात तरुणीच्या बुरख्याला हात घातल्याचा मुद्दा महापालिका निवडणुकीत घेणार आहेत. आमच्या मुली, महिलांच्या बुरख्यावर हात घातले जात आहेत, असा त्यांचा आरोप आहे. यावर कोण बुरख्याला हात लावायला चालले? इम्तियाज जलील व एमआयएम ही सगळी दलाल मंडळी आहे. ओवेसींच्या वडिलांनी बाबरी प्रकरणात खासदार असताना आक्रमक भूमिका घेतली आणि हैदराबादमध्ये तोडपाणी करून संस्था आणल्या, हे त्यांचे धंदे आहेत, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT