Mla Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : मी शपथेवर सांगतो, वर्षावर झालेल्या बैठकीत तसे काही घडलेच नाही...

Marathwada : आम्ही आता कशाचेच टेन्शन घेत नाही, कारण मुख्यमंत्री ही सगळी परिस्थिती व्यवस्थीत हाताळत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल वर्षावर झालेल्या बैठकीवरून ज्या बातम्या माध्यमांवर दाखवल्या त्या खोट्या आहेत. या बैठकीत कोणत्याही आमदारामध्ये मंत्रीपदावरून वाद किंवा बाचाबाची झालेली नाही. (Sanjay Shirsat News) एकमेकांच्या बोकांडी बसायला आमदार प्रगल्भ नाहीत का? या सगळ्या सुत्रांनी दिलेल्या फेक बातम्या आहेत, मी हे शपथेवर सांगयाला तयार आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाद झाल्याचे नाकारले.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, राज्यात झालेल्या घडामोडी, राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभाग याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिली. त्यानंतर आगामी निवडणुकीत पक्षाची वाटचाल कशी असेल? या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत इतर कुठलीही चर्चा झालेली नाही. राहिला नाराजीचा प्रश्न तर आम्ही आता कशाचेच टेन्शन घेत नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही सगळी परिस्थिती व्यवस्थीत हाताळत आहेत.

एवढेच नाही तर येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. (Marathwada) काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांनी विधानसभेच्या ९० जागा लढवणार असल्याचे सांगितले. मग तुम्ही आणि भाजप किती लढवणार?

या प्रश्नावर आम्ही २८८ लढवणार असे उपरोधिक उत्तर शिरसाट यांनी दिले. विधानसभा निवडणुकीला अजून दीडवर्ष बाकी आहे. अजून जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा कोणत्याच पक्षात नाही. अजित पवार कार्यकर्त्यांसमोर बोलले असले तरी ते अंतिम नाही. निवडणुकीच्या आधी या सगळ्या गोष्टी ठरत असतात, त्यामुळे अजित पवारांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गजर नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT