Sanjay Shirsat On Shivsena Bhavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर, त्यावर दावा कसा सांगणार ?

Eknath Shinde : आमदारांसाठी व्हिप काढणार आहेत. तो ठाकरे गटाच्या आमदारांना देखील लागू होईल.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर शिंदे आता शिवसेना भवनावर देखील दावा सांगणार, अशी चर्चा होवू लागली. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देतांना शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरावर दावा सांगितला जात नसतो, असे म्हणत या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेच्या राज्यात कुठेही स्वतःच्या मालकीच्या शाखा नाहीत, त्यामुळे आम्ही शाखा ताब्यात घेणार या आरोपाला देखील काही अर्थ नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. (Shivsena) निडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षांचा नवा अंक सुरू झाला आहे. (Election Commission) निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

परंतु त्यानंतर राज्यात शिंदे आता शिवसेना भवनावर दावा सांगणार, मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेणार अशा चर्चा सुरू झाल्या. विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर या चर्चेला अधिकच हवा मिळत आहे. मात्र यावर शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, आम्ही कोणत्याही शाखेवर कब्जा करणार नाहीत, कारण राज्यात कुठंही पक्षाच्या नावावर शाखा नाहीत, शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे, मंदिरावर कब्जा होत नसतो. आम्ही जेव्हा शिवसेना भवनसमोरून जाऊ तेव्हा आम्ही आमचं मस्तक झुकवू.

येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशना मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना आमदारांसाठी व्हिप काढणार आहेत. तो ठाकरे गटाच्या आमदारांना देखील लागू होईल. जर कोणी व्हीप मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई होईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT