Mla Sanjay Shirsat News
Mla Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Court Decision : आम्हाला अपेक्षित निर्णयच आला, आम्ही खूष आहोत..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही उठाव केला होता, तेव्हा सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार करून केला होता. कुठेही कायद्याची चौकट मोडायची नाही हे ठरवलं होतं, आम्ही तेच केलं. आजचा निकाल हा त्याचाच परिणाम आहे. आम्हाला अपेक्षित असा हा निकाल आहे, त्यामुळे आम्ही खूष आहोत, अशा शब्दात शिवसेनेच प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

आमचे प्रतोद हे भरत गोगावले हेच आहेत, सुप्रीम कोर्टाने त्यांची निवड बेकायदेशीर ठरवली असली तरी आता पक्ष म्हणून आम्ही नव्याने विधानसभा अध्यक्षांकडे रितसर विनंती अर्ज करून पुन्हा त्यांची प्रतोद म्हणून निवड करून घेणार आहोत, असेही (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शिरसाट म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विरोधक जजच्या भूमिकेतून विधान करत होते. (Shivsena) आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे, तेव्हा त्यांनी आपली तोंड बंद ठेवावीत. राज्यात जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आणि (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तेव्हा कायदेशीर बाजूंचा पुर्ण अभ्यास केला होता.

हा उठाव करतांना कुठेही कायद्याची चौकट मोडली जाणार नाही, याची संपुर्ण काळजी घेण्यात आली होती. त्यामुळेच आधी निवडणूक आयोगाने आम्हालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती आणि पक्षाचे चिन्ह देखील दिले. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण होते, यावरही आज सुप्रीम कोर्टाने तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे असे स्पष्ट केले.

आता शिवसेना पक्षाचा प्रतोद कोण? हा विषय पुन्हा येण्याचे कारण नाही, आम्ही भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता आम्ही नव्याने त्यांच्या निवडीवर विधानसभा अध्यक्षांच्या वतीने शिक्कामोर्तब करून घेवू. आम्हीच खरी शिवसेना असल्यामुळे आमच्या प्रतोदांचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांना देखील लागू होईल. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात काय चित्र असेल हे देखील तुम्हाला दिसेल, असा सूचक इशारा देखील संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT