Bjp Mla Santosh Danve-Minister Abdul Sattar
Bjp Mla Santosh Danve-Minister Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Danve : सत्तारांना वेडाचे झटके, त्यांना उपचारांची गरज..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना वेडाचे झटके येत आहेत, त्यांना रूग्णालयात दाखल करून उपचारांची गरज आहे. दानवे कुटुंबावर टीका केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. (Shivsena) आमच्यावर टीका करून ते मोठं होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा पलटवार भाजपचे आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना संतोष दानवे हे महाविकास आघाडीला मतदान करतील, असा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देतांना भोकरदन-जाफ्राबादचे आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे म्हणाले, सत्तार यांनी केलेला दावा हा बाळबोध आणि दिशाभूल करणारा आहे. (Bjp) बहुदा त्यांना वेडाचे झटके येत असावेत, लवकरात लवकर त्यांना हाॅस्पीटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे.

सत्तार यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांचा जन्म हा तीन घरात झाला आहे, आम्ही त्यांच्या सारखे तीन घरात जन्माला आलेलो नाहीत. दानवे परिवारावर टीका केल्याशिवाय बहुदा सत्तार यांचा दिवसच उजाडत नाही. सत्तारांना आणि त्यांनी केलेल्या दाव्याला कवडीचीही किमंत नाही, आमच्यावर सतत टीका करून ते मोठं होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत, असल्याचेही दानवे म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडून पाठवायच्या सात जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे तर भाजपसमोर तिसरा उमेदवार विजयी करण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संतोष दानवे हे महाविकास आघाडीलाच मतदान करतील, असा दावा केला होता.

संतोष दानवे यांचे मत म्हणजे माझ्या घरातलेच आहे, ते मी फोडणारच. माझे दानवे कुटुंबाशी घरगुती संबंध आहेत, सगळी सेटिंग झाली आहे, मी त्यांच्या घरी जाऊन चहा पिऊन आलो आहे. त्यामुळे मी संतोष दानवेंचे एक मत फोडणार म्हणजे फोडणारच, असा दावा सत्तार यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT