Walmik karad sarkarnama
मराठवाडा

Walmik karad : वाल्मिक कराडसोबत फोटो काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला दणका; आव्हाडांच्या आक्षेपानंतर मोठी कारवाई

API Mahesh Vighne Remove From SIT Team : आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महेश विघ्ने यांच्यासह हवलादार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

Mangesh Mahale

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमधील पोलीस अधिकारी महेश विघ्ने हे वादात सापडले आहेत.

वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे महेश विघ्ने यांच्या अंगलट आले आहे. एपीआय महेश विघ्ने यांच्यासह इतर दोघांना एसआयटीतून बाजूला करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. अशातच कराड याच्यासोबत महेश विघ्ने यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं. भाजपने आमदार सुरेश धस यांनी याबाबत काल (रविवारी) पुण्यातील सभेत महेश विघ्ने यांच्या नियुक्तीवर कडाडून हल्लाबोल केला होता.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महेश विघ्ने यांच्यासह हवलादार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शरद पवार यांनी सोशल मीडिया x वरुन सरकारला पत्र लिहिलं आहे.

बीड लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्या, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT