Santosh Deshmukh | Dhananjay Munde | Walmik Karad  sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड यांनी सरेंडर करावं अन् धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा..'; कुणी केली मोठी मागणी?

Anjali Damania On Dhananjay Munde And Walmik Karad : धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र आर्थिक व्यवहार आहेत आणि ते आपण दाखवले आहेत. या दोघांची दहशत,व्यवहार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत.

Deepak Kulkarni

Beed News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहेत.याप्रकरणावरुन आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड या हत्येमागचा मास्टरमाईंड असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) काहीसे बॅकफूटला गेले आहेत. याचवेळी आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे.

वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण करावं आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केली आहे.याचवेळी त्यांनी मुंडे आणि कराड ही दोन माणसं दहशत निर्माण करून फक्त पैसा मिळवत आहेत. यामुळे मराठा समाजाने आत्ता जात-पात विसरून न्याय हक्कांसाठी एकत्र यावं असं आवाहनही दमानिया यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांत ते राज्याचे तत्कालीन गृहमंत्री होते.आताही त्यांच्याकडे हे पद आहे. तरी मग बीडमध्ये इतक्या बंदुकींची आवश्यकता का आहे ? अशी विचारणाही त्यांनी केली. बीड जिल्ह्यात बंदुक घेऊन व्हिडिओ तयार करणे ही फॅशन झाल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे.

धनंजय मुंडे हे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांच्या पाठीशी आहेत,असा सनसनाटी आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंदुक परवान्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, परभणी जिल्ह्यात 32 बंदुक परवाने तर अमरावती जिल्ह्यात 243 बंदुक परवाने आहेत. मग एकट्या बीडमध्येच 1 हजार 222 बंदुक परवाने कसे देण्यात आले, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

कैलास फड आणि निखिल फड हे दोघे बाप लेक गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत का? ही गंभीर परिस्थिती आहे. हे लोक हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करत असल्याचा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र आर्थिक व्यवहार आहेत आणि ते आपण दाखवले आहेत. या दोघांची दहशत,व्यवहार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत. जगमित्र शुगर नावाची कंपनी आहे. त्यात त्याच्या नावावर जमीन आहे आणि त्याच कंपनीमध्ये राजश्री मुंडे या देखील सहभागी आहेत, असे दमानिया यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT