Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. फडणवीस त्यांचे प्रतिनिधी संतोष देशमुख प्रकरण संपवणार असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं? हे मला माहिती नाही. पण संतोष देशमुख प्रकरण फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांचे प्रतिनिधी संपवणार.
या हत्या प्रकरणाची विल्हेवाट कशी पद्धतशीरपणे लावण्यात आली आहे हे थोड्या दिवसांत कळेल, असं खळबळजनक वक्तव्य जरांगे यांनी केलं. तंसच या हत्या प्रकरणातील काही सहआरोपींना थांबवण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रतिनिधींनी दिली आहे. देशमुख कुटुंब आणि आम्ही ठरवून काही सहआरोपी होणारे थांबवल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
पण जेव्हा कधी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी त्यांच्यासोबत उभा राहील, असंही ते जरांगे यावेळी (Manoj Jarange Patil) म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरून त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस चार मागण्या तात्काळ पूर्ण करणार होते. मात्र अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. दोन वर्षांपासून माझा समाज रस्त्यावरती आहे. मात्र सरकार विश्वासघात करत असून किती संयम कुठपर्यंत असावा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.