Minister Abdul Sattar-Girish Mahajan News Aurangabad
Minister Abdul Sattar-Girish Mahajan News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

सत्तारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सरपंचाचे गिरीश महाजनांना साकडे..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बढती मिळून कॅबिनेट मंत्री झालेले अब्दुल सत्तार यांच्याच सोयगांव मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांसाठी एका सरपंचाने थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच साकडे घातले आहे. तुम्हीच आमच्या तालुक्याचे जनक आहात, आम्हाला पदरात घ्या, अशी विनंतीही या सरपंचाने केली आहे.

एकीकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे मतदारसंघात कोट्यावधींची विकासकामे आणल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील गावचा सरपंच मात्र शेजारच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडतो अशी विरुद्ध स्थिती पहायला मिळते आहे. (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील घोसला गावचे तरुण सरपंच गणेश माळी यांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे जाऊन भेट घेतली.

फर्दापुर ते चाळीसगाव या एकमेव मुख्य रस्त्याचे भिजत घोंगडे आणि तालुक्याच्या इतर विकासाकामांसाठी निधी देऊन ते मार्गी लावा, अशी मागणी या भेटी सरपंच माळी यांनी केली. मुंबईला जाण्याच्या घाईत असतांना देखी महाजन यांनी सरपंच माळी यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. चाळीसगाव-फर्दापूर रस्त्यासह सोयगाव तालुक्यातील इतर विकासकामे देखील लवकरच मार्गी लावतो, असे आश्वासन देखील महाजन यांनी दिले.

तुम्हीच तालुक्याचे जनक असल्याने आदिवासी व मागासलेल्या तालुक्याला आता पदरात घ्या, अशी विनंतीही माळी यांनी या भेटीत महाजनांना केली. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सत्तेत आणि सत्ते बाहेर असलेले लोकप्रतिनिधी कुचकामी ठरल्याचा आरोप करत माळी यांनी अप्रत्यक्षरित्या कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत व मंत्री व राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावला.

घोसला गावातील विविध विकासकामांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या ठरावाची प्रत देखील माळी यांनी यावेळी महाजन यांना दिली. यात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय उभारणीचा ठराव देखील असून आता तो थेट मुंबई दरबारी गेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT