Beed News, 08 Jan : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय या प्रकरणामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कारण या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप होत आहे. तर हाच कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असून ते कराडला वाचवत असल्याचाही आरोप केला जात आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.
मात्र, धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका करताना जानकर यांची जीभ घसरली आहे. "आजपर्यंत स्त्री वेश्या असतात माहिती होतं पण 'पुरुष वेश्याही असू शकतो हे पहिल्यांदाच पाहिलं, असं म्हणत त्यांनी मुंडेंचा पुरुष वेश्या असा उल्लेख केला. शिवाय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही जानकरांनी केला आहे.
तसंच सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी झाल्यानंतरच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलिस स्टेशनमध्ये मिळत आहे, असा खळबळजनक दावा देखील जानकर यांनी केला आहे. दरम्यान, काल केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही.
असं सांगत विरोधकांचा दावा खोडून काढला होता. तर त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले, "निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो. स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे, हे देशाला घातक आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.